महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६ महत्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६ वैशिष्ट्ये
पुरस्कार विजेत्यांची पारदर्शक निवड प्रक्रिया
आलेल्या सर्व प्रस्तावांचे डिजिटल रेकॉर्ड मेंटेनन्स
ऑनलाईन पद्धतीने प्रस्ताव दाखल सुविधा
ऑफलाईन पद्धतीने ही प्रस्ताव दाखल सुविधा
रु. ५०००/- मात्र नामनिर्देशन शुल्क
संपूर्ण राज्यातून अनेक अधिकारी विजेते निवडले जाणार
शैक्षणिक क्षेत्रातील राज्यातील एक नावाजलेली संस्था
पुरस्कार सोहळ्याला सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
प्रस्तावासाठी महत्वाच्या आवश्यक अटी व शर्ती
प्रस्तावक महाराष्ट्र राज्यातील शासकीय किंवा निमशासकीय संस्थेत कार्यरत अधिकारी अथवा कर्मचारी असावा.
राज्य शासन, केंद्र शासन, तसेच सरकारी उपक्रमांतील अधिकारी/कर्मचारी वर्ग या पुरस्कारासाठी पात्र राहतील.
प्रस्तावकाचे सेवाकाल किमान १ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
प्रस्तावक निर्व्यसनी असावा. अंतिम निवड करताना “बी द चेंज फाउंडेशन” तर्फे संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून या गोष्टीची खातरजमा केली जाईल.
कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशी सुरु नसावी किंवा प्रस्तावक निलंबित नसावा.
प्रस्तावकाने आपल्या सेवाकाळात नैतिक आचारसंहिता, प्रामाणिकपणा, जबाबदारी व शिस्तपालनाचे उत्तम उदाहरण सादर केलेले असावे.
प्रस्तावकाने आपल्या कार्याशी संबंधित कोणत्याही प्रकारची चुकीची अथवा दिशाभूल करणारी माहिती दिल्यास त्याचा प्रस्ताव अवैध ठरेल.
प्रस्ताव दाखल करत असतांना प्रस्तावकाने दिलेली माहिती व पुरावे हे चुकीची अथवा दिशाभूल करणारी नसावी.
पुरस्कारासाठी सादर केलेले सर्व पुरावे स्वयंसाक्षांकित (Self-attested) असणे आवश्यक आहे.
प्रस्तावकाने आपल्या कार्यक्षेत्रात नवोपक्रम, जनसेवा, पारदर्शकता व समाजहितासाठी केलेले योगदान स्पष्टपणे नमूद करावे.
प्रस्तावात दिलेली माहिती व कागदपत्रे “बी द चेंज फाउंडेशन” च्या तज्ञ समितीद्वारे पडताळणी केली जाईल.
निवड झालेल्या सर्व गुणगौरव पुरस्कारार्थींच्या कागदपत्रांची व सेवाविवरणांची अंतिम खातरजमा संबंधित विभाग अथवा संस्थेशी थेट संपर्क साधून केली जाईल.
कोणत्याही कारणास्तव चुकीची माहिती दिल्याचे आढळल्यास संबंधित व्यक्तीचा पुरस्कार रद्द करण्यात येईल.
प्रस्तावकाने आपल्या सेवाकाळात नवीन कल्पना, तांत्रिक नवोपक्रम, प्रशासनिक सुधारणा किंवा नागरिकाभिमुख उपक्रम राबविले असल्यास त्यास विशेष प्राधान्य दिले जाईल.
सदर कार्यक्रमासाठी घेतलेले नामांकन शुल्क हे पूर्णतः कार्यक्रमाच्या खर्चासाठी वापरण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सेवाभावी तत्त्वावर – ना नफा ना तोटा – आयोजित करण्यात येत आहे.
राज्य शासनाच्या विविध विभागांमधील अधिकारी आणि कर्मचारी वर्ग समाजाच्या प्रगतीसाठी समर्पित वृत्तीने कार्य करत असतात. शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविणे, नागरिकाभिमुख उपक्रम सुरू करणे, पारदर्शकता राखणे आणि जनतेचा विश्वास जिंकणे हे त्यांच्या कार्याचे खरे वैशिष्ट्य आहे. अशा समर्पित, निष्ठावान आणि अभिनव विचारसरणी असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान दरवर्षी शासन किंवा विविध संस्थांद्वारे केला जातो. तथापि, अनेक मेहनती, होतकरू आणि उपक्रमशील अधिकारी/कर्मचारी असे आहेत ज्यांचे योगदान अद्याप व्यापक पातळीवर प्रकाशझोतात आलेले नाही. अशा उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना ओळखून त्यांचा सन्मान करण्याच्या उदात्त हेतूने “बी द चेंज फाउंडेशन” (रजि.) तर्फे “महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६” चे आयोजन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्यातील विविध मंत्रालयांतील वर्ग २ व त्या खालील शासकीय पदांची यादी
महसूल व वन विभाग
वर्ग २ पदे
| अनुक्रमांक | पद |
|---|---|
| १ | तहसीलदार |
| २ | नायब तहसीलदार |
| ३ | उपविभागीय अधिकारी |
| ४ | मंडळ अधिकारी |
वर्ग ३ व ४ पदे
| अनुक्रमांक | पद |
|---|---|
| १ | तलाठी |
| २ | लिपिक |
| ३ | लेखनिक |
| ४ | सर्वेक्षक |
| ५ | शिपाई |
कृषि विभाग
वर्ग २ पदे
| अनुक्रमांक | पद |
|---|---|
| १ | कृषी अधिकारी |
| २ | कृषी पर्यवेक्षक |
| ३ | तालुका कृषी अधिकारी |
वर्ग ३ व ४ पदे
| अनुक्रमांक | पद |
|---|---|
| १ | कृषी सहाय्यक |
| २ | कनिष्ठ लिपिक |
| ३ | प्रयोगशाळा सहाय्यक |
| ४ | वाहनचालक |
पशुसंवर्धन विभाग
वर्ग २ पदे
| अनुक्रमांक | पद |
|---|---|
| १ | पशुधन विकास अधिकारी |
| २ | पशुवैद्यकीय अधिकारी |
वर्ग ३ व ४ पदे
| अनुक्रमांक | पद |
|---|---|
| १ | पशुपालक पर्यवेक्षक |
| २ | पशुवैद्य सहाय्यक |
| ३ | पशुखाद्य निरीक्षक |
| ४ | लिपिक |
दिव्यांग कल्याण विभाग
वर्ग २ पदे
| अनुक्रमांक | पद |
|---|---|
| १ | जिल्हा दिव्यांग कल्याण अधिकारी |
| २ | समाजकल्याण अधिकारी |
वर्ग ३ व ४ पदे
| अनुक्रमांक | पद |
|---|---|
| १ | समाजकल्याण निरीक्षक |
| २ | गृहपरिचर |
| ३ | सहाय्यक लिपिक |
| ४ | लिपिक टंकलेखक |
महिला व बालकल्याण विभाग
वर्ग २ पदे
| अनुक्रमांक | पद |
|---|---|
| १ | बालविकास प्रकल्प अधिकारी |
| २ | बालविकास प्रकल्प अधिकारी |
वर्ग ३ व ४ पदे
| अनुक्रमांक | पद |
|---|---|
| १ | अंगणवाडी पर्यवेक्षक |
| २ | बालसंवर्धिका |
| ३ | वरिष्ठ लिपिक |
| ४ | परिचारिका |
सुसंमलघू व खादीग्रामोद्योग विभाग
वर्ग २ पदे
| अनुक्रमांक | पद |
|---|---|
| १ | उद्योग निरीक्षक |
| २ | सहाय्यक उद्योग अधिकारी |
वर्ग ३ व ४ पदे
| अनुक्रमांक | पद |
|---|---|
| १ | लघुउद्योग सहाय्यक |
| २ | लिपिक |
| ३ | कार्यालयीन परिचर |
जलसंपदा विभाग
वर्ग २ पदे
| अनुक्रमांक | पद |
|---|---|
| १ | उपअभियंता |
| २ | विभागीय अधिकारी |
वर्ग ३ व ४ पदे
| अनुक्रमांक | पद |
|---|---|
| १ | कनिष्ठ अभियंता |
| २ | नकाशाकार |
| ३ | लिपिक |
| ४ | जलवाहक |
गृह विभाग
वर्ग २ पदे
| अनुक्रमांक | पद |
|---|---|
| १ | उपविभागीय पोलिस अधिकारी |
| २ | सहाय्यक पोलिस उपअधीक्षक |
| ३ | कारागृह अधीक्षक |
वर्ग ३ व ४ पदे
| अनुक्रमांक | पद |
|---|---|
| १ | पोलिस उपनिरीक्षक |
| २ | हवालदार |
| ३ | सिपाही |
| ४ | लिपिक |
| ५ | परिचर |
वित्त विभाग
वर्ग २ पदे
| अनुक्रमांक | पद |
|---|---|
| १ | सहाय्यक लेखा अधिकारी |
| २ | लेखा निरीक्षक |
वर्ग ३ व ४ पदे
| अनुक्रमांक | पद |
|---|---|
| १ | लिपिक टंकलेखक |
| २ | लेखनिक |
| ३ | कनिष्ठ लेखा सहाय्यक |
शिक्षण विभाग
वर्ग २ पदे
| अनुक्रमांक | पद |
|---|---|
| १ | मुख्याध्यापक |
| २ | सहाय्यक शिक्षणाधिकारी |
| ३ | शिक्षण निरीक्षक |
वर्ग ३ व ४ पदे
| अनुक्रमांक | पद |
|---|---|
| १ | शिक्षक |
| २ | लिपिक |
| ३ | प्रयोगशाळा सहाय्यक |
| ४ | परिचर |
क्रीडा व युवक कल्याण विभाग
वर्ग २ पदे
| अनुक्रमांक | पद |
|---|---|
| १ | क्रीडा अधिकारी |
| २ | युवक कल्याण अधिकारी |
वर्ग ३ व ४ पदे
| अनुक्रमांक | पद |
|---|---|
| १ | क्रीडा प्रशिक्षक |
| २ | लिपिक |
| ३ | मैदान सहाय्यक |
सहकार विभाग
वर्ग २ पदे
| अनुक्रमांक | पद |
|---|---|
| १ | सहाय्यक निबंधक सहकारी संस्था |
वर्ग ३ व ४ पदे
| अनुक्रमांक | पद |
|---|---|
| १ | सहकारी निरीक्षक |
| २ | लिपिक |
| ३ | कार्यालयीन सहाय्यक |
इतर विभाग
वर्ग २ पदे
| अनुक्रमांक | पद |
|---|---|
| १ | सहाय्यक नगररचनाकार |
| २ | वैद्यकीय अधिकारी |
| ३ | पुरवठा निरीक्षक |
| ४ | श्रम अधिकारी |
वर्ग ३ व ४ पदे
| अनुक्रमांक | पद |
|---|---|
| १ | कनिष्ठ अभियंता |
| २ | आरोग्य निरीक्षक |
| ३ | लिपिक |
| ४ | परिचर |
राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५
दि. २९ जून २०२५ रोजी शिर्डी, महाराष्ट्र येथे संपन्न.
या प्रतिष्ठित कार्यक्रमात आदर्श शिक्षकांच्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यात आला असून राज्यभरातील १३०० हून अधिक शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर
उत्कृष्टता पुरस्कार प्रदान समारंभ
हा व्हिडिओ माहितीस्तव म्हणून पहावा! अशाच पद्धतीचा भव्यदिव्य महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार सोहळा २०२६ घेण्याचा आपल्या संस्थेचा मानस आहे
सदर छायाचित्रे माहितीस्तव म्हणून पाहवेत
अशाच पद्धतीचा भव्यदिव्य महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार सोहळा २०२६ घेण्याचा आपल्या संस्थेचा मानस आहे.
महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६ प्रस्तावासाठी आवश्यक निकष
अधिकारी/कर्मचारी यांनी कार्यकाळात प्रामाणिक, पारदर्शक आणि जबाबदार सेवा बजावलेली असावी.
कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशी, निलंबन अथवा शिस्तभंग कारवाई प्रलंबित नसावी.
विभागाच्या कामकाजात सुलभता, पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवकल्पना राबविलेली असावी.
डिजिटलायझेशन, ई-गव्हर्नन्स, ऑटोमेशन किंवा प्रक्रियेसुधारणा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान.
नागरिकाभिमुख उपक्रम, सामाजिक जबाबदारी, पर्यावरण संवर्धन, महिला व बालकल्याण, शिक्षण, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रात सक्रिय सहभाग.
सहकारी अधिकारी व कर्मचारी यांच्यात समन्वय साधत कामकाज यशस्वीपणे पार पाडलेले असावे.
नेतृत्वगुण, निर्णयक्षमता आणि आव्हानात्मक परिस्थितीत कार्यक्षमतेचे प्रदर्शन.
संबंधित विभाग, कार्यालय किंवा प्रकल्पाच्या कार्यक्षमतेत मोजता येईल अशी सकारात्मक सुधारणा केलेली असावी.
नागरिकांना थेट फायदा होईल अशी योजना किंवा उपक्रम राबविलेले असावेत.
वैयक्तिक व व्यावसायिक कौशल्यविकासासाठी घेतलेले प्रशिक्षण, कार्यशाळा किंवा संशोधनात्मक उपक्रम.
कार्यक्षेत्रातील ज्ञान, कौशल्य व गुणवत्ता वृद्धी करण्यासाठी सतत प्रयत्नशील असणे.
शासन, जिल्हा परिषद, किंवा अन्य प्रतिष्ठित संस्थेकडून प्राप्त पुरस्कार, सन्मान अथवा प्रशस्तीपत्रे.
समाजात प्रेरणादायी ठरणारे कार्य किंवा प्रकल्प.
शासकीय जबाबदाऱ्या पार पाडताना समाजाशी सुसंवाद राखून सकारात्मक परिणाम घडविणारे कार्य.
जनजागृती, नैतिक मूल्ये, आरोग्य, स्वच्छता, शिक्षण किंवा पर्यावरण विषयक मोहिमा राबवून समाजावर सकारात्मक प्रभाव निर्माण केलेला असावा.
महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६ विषयी नेहमी विचारले जाणारे प्रश्न
Ans.“बी द चेंज फाउंडेशन” (रजि.) तर्फे आयोजित हा उपक्रम राज्यातील विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी दरवर्षी आयोजित केला जातो.
Ans.महाराष्ट्र राज्यातील शासकीय, निमशासकीय, केंद्र शासनाच्या उपक्रमांतील तसेच समाजहितासाठी कार्य करणारे अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते अर्ज करू शकतात.
Ans. अर्जदाराने www.mahaaward.com या वेबसाईटवर जाऊन “प्रस्ताव सादर करा” या लिंकवर क्लिक करावे. तिथे दिलेल्या फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरून सबमिट करावी.
Ans. होय. वेबसाईटवरून प्रस्ताव अर्ज नमुना डाउनलोड करून तो भरावा व आवश्यक कागदपत्रांसह ई-मेलद्वारे awardmaha@gmail.com वर पाठवावा.
Ans.स्वयं साक्षांकित (self-attested) सेवा प्रमाणपत्र, कार्याचा पुरावा, ओळखपत्र, प्रमाणपत्रांच्या प्रती इत्यादी कागदपत्रे जोडावीत.
Ans. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२६ आहे.
Ans. प्राप्त प्रस्तावांची पडताळणी “बी द चेंज फाउंडेशन” च्या तज्ज्ञ समितीद्वारे केली जाईल. निवड पारदर्शक निकषांवर आधारित असेल.
Ans.निवड झालेल्या गुणगौरव पुरस्कारार्थींना शाल, फेटा, ट्रॉफी आणि सन्मानपत्र देण्यात येईल.
Ans.नामनिर्देशन शुल्क रु. ५०००/- इतके आहे. हे शुल्क वेबसाईटवरील “नामनिर्देशन शुल्क भरा” या लिंकवरून भरता येते.
Ans.महसूल, कृषि, गृह, वित्त, शिक्षण, पशुसंवर्धन, दिव्यांग कल्याण, जलसंपदा, सहकार, क्रीडा व युवक कल्याण, महिला व बालकल्याण तसेच इतर सर्व शासकीय विभागांतील अधिकारी व कर्मचारी पात्र आहेत.
Ans.महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार वितरण समारंभ १ मार्च २०२६ रोजी शिर्डी येथे भव्यदिव्य पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे.
Ans.आपल्या कोणत्याही शंका अथवा माहितीकरिता संपर्क करा: 📧 awardmaha@gmail.com 🌐 www.mahaaward.com 📞 +91 8796696960
महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार
उपस्थित राहणार असणारे मान्यवर
राज्यस्तरावरील आदर्श असलेले सामाजिक, शैक्षणिक व अधिकारी वर्गातील मान्यवर
बी दी चेंज फाउंडेशन अंतर्गत झालेले आमचे इतर उपक्रम
राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ - प्रथम पुष्प
राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ – वृत्तपत्र दृष्यचित्रं
राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ - द्वितीय पुष्प
राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ – वृत्तपत्र दृष्यचित्रं
महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६
आयोजक मंडळ
मा. मयूर ढोकचौळे सर
अध्यक्ष, महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६
अध्यक्ष, बी द चेंज फाउंडेशन
संचालक, स्केलझेन टेक्नॉलॉजी'ज प्रायव्हेट लिमिटेड
https://scalezen.in/
मयूर ढोकचोळे हे Scalezen Technologies Private Limited या शैक्षणिक सल्लागार कंपनीचे संस्थापक आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व आहेत. शिक्षण क्षेत्रात त्यांचा प्रचंड अनुभव असून, त्यांनी CBSE शाळा, इंग्रजी माध्यम शाळा आणि NDA अकॅडमीमध्ये पाच वर्षे प्राचार्य म्हणून यशस्वी कारकीर्द बजावली आहे.
फक्त एका संस्थेपुरते मर्यादित न राहता, ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचावे या उद्देशाने त्यांनी Scalezen Technologies Pvt. Ltd. ची स्थापना केली. या कंपनीमार्फत ते विविध शाळा, कॉलेजेस आणि NDA/NEET/JEE अकॅडमीसाठी शैक्षणिक व प्रशासकीय मार्गदर्शन, व्यवस्थापन सुलभीकरण आणि टेक्नॉलॉजी सोल्युशन्स देत आहेत.
ScaleZen ही कंपनी सध्या शाळा, कॉलेजेस, इंजिनिअरिंग आणि मेडिकल महाविद्यालये अशा विविध प्रकारच्या ३० पेक्षा जास्त शैक्षणिक संस्थांमध्ये आपली कन्सल्टन्सी सेवा पुरवत आहे. या सर्व संस्थांमध्ये ScaleZen कंपनी अकॅडेमिक, ऍडमिनीट्रेशन, डिजिटल मार्केटिंग, ब्रँडिंग, अॅडमिशन कन्सल्टन्सी, शैक्षणिक धोरण आखणी आणि व्यवस्थापन या क्षेत्रात सल्ला व सेवा पुरवत आहे.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा मिळाव्यात, अभ्यासक्रमानुसार सराव करता यावा यासाठी त्यांनी "परीक्षा पोर्टल" या मोबाइल व वेब ॲपची निर्मिती केली आहे. आज अनेक विद्यार्थी या ॲपचा लाभ घेत असून, त्याचा उपयोग दैनिक सराव, डेली टेस्ट्स, स्टडी मटेरियल आणि निकाल व्यवस्थापनासाठी केला जातो.
मा. अभिषेक तुपे सर
उपाध्यक्ष, महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६
मा. अभिषेक तुपे सर हे "महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६" चे उपाध्यक्ष असून, समाजातील विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कार्याचा गौरव करण्याच्या या उपक्रमामागील प्रमुख प्रेरणास्त्रोत आहेत. समाजाच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचारी, उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना योग्य सन्मान मिळावा, हा त्यांचा ध्येयदृष्टिकोन आहे.
“प्रत्येक क्षेत्रातील समर्पित आणि प्रामाणिक व्यक्तींना त्यांच्या कार्याचा सन्मान मिळालाच पाहिजे,” या विचारावर ठाम राहून तुपे सरांनी समाजात सकारात्मक बदल घडविणाऱ्या व्यक्तींना ओळख देण्याचा संकल्प केला. त्यांनी "बी द चेंज फाउंडेशन" तर्फे महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील प्रेरणादायी कार्यकर्त्यांचा गौरव करण्यासाठी "महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६" हा उपक्रम सुरू केला आहे.
तुपे सरांचा हा उपक्रम म्हणजे राज्यातील प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांसाठी एक प्रेरणास्थान आहे — जो त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करतो, त्यांच्या कार्याला समाजात योग्य प्रतिष्ठा मिळवून देतो आणि इतरांना प्रेरित करतो.
