Explore Our Impact Areas
Want to see our areas of Work. Click here to View More
शिर्डी, दि. १७ मे २०२६ – “बी द चेंज फाउंडेशन” आयोजित महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६ हा राज्यस्तरीय भव्य पुरस्कार वितरण सोहळा दिनांक १७ मे २०२६ रोजी शिर्डी येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. महाराष्ट्रातील विविध शासकीय, निमशासकीय, खाजगी तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
समाजाच्या सर्वांगीण विकासामध्ये प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने आणि जबाबदारीने कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातून प्राप्त झालेल्या प्रस्तावांचे परीक्षण करून विविध क्षेत्रांतील गुणवंत व्यक्तींची निवड करण्यात आली. कार्यक्रमास सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून समाजहितासाठी कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या योगदानाचे कौतुक केले तसेच अशा प्रेरणादायी उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली.
“महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार” हा केवळ पुरस्कार नसून समाजासाठी प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाला दिलेली कृतज्ञ मानवंदना आहे. या उपक्रमामुळे राज्यातील अनेक अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना नवी प्रेरणा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. यावेळी आयोजकांच्या वतीने राज्यभरातून सहभागी झालेल्या सर्व मान्यवर, पुरस्कार विजेते, सहयोगी संस्था आणि उपस्थितांचे आभार मानण्यात आले.
अधिक माहितीराष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ समारंभ उत्साहात संपन्न “बी द चेंज फाउंडेशन” तर्फे आयोजित राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ समारंभ रविवार, १८ जानेवारी २०२६ रोजी मुंबई येथील आरंभ हॉलमध्ये मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यासाठी आयोजित या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या समारंभात देशभरातील प्रतिभावान, समर्पित आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या शिक्षकांचा त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्यासाठी तसेच सामाजिक योगदानासाठी सन्मान करण्यात आला. या प्रसंगी सर्वांगीण विद्यार्थी विकास, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि समाजहितासाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांमुळे शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे अधोरेखित करण्यात आले.
आयोजकांनी सांगितले की, या उपक्रमाचा उद्देश शिक्षकांच्या कार्याची दखल घेणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे तसेच समाजामध्ये शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणे हा आहे. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करून अशा कार्यक्रमांमुळे शिक्षकांचा सन्मान व प्रतिष्ठा वाढेल आणि शिक्षण क्षेत्र अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी कार्य करणाऱ्या शिक्षकांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे गुणवंत शिक्षकांचा गौरव करून शिक्षण क्षेत्रात प्रेरणा निर्माण करण्याचा संकल्प संस्थेने व्यक्त केला आहे.
Learn Moreतुमचा प्रस्ताव सोप्या पद्धतीने ऑनलाइन दाखल करा. तत्काळ पुष्टी मिळवा.
नोंदणी करा 🚀Want to see our areas of Work. Click here to View More
Our NGO is recognized by the Government of India, and we have also received certification from NITI Aayog.
पुरस्कार विजेत्यांची पारदर्शक निवड प्रक्रिया
सर्व प्रस्तावांचे डिजिटल रेकॉर्ड मेंटेनन्स
ऑनलाईन प्रस्ताव दाखल सुविधा
ऑफलाईन प्रस्ताव दाखल सुविधा
₹5000
₹3000
नामनिर्देशन शुल्क
संपूर्ण राज्यातून अधिकारी निवडले जाणार
राज्यातील नावाजलेली संस्था
मान्यवरांची विशेष उपस्थिती
प्रस्तावक महाराष्ट्र राज्यातील शासकीय, निमशासकीय किंवा खाजगी संस्थेत कार्यरत अधिकारी अथवा कर्मचारी असावा.
राज्य शासन, केंद्र शासन, तसेच सरकारी उपक्रमांतील अधिकारी/कर्मचारी तसेच खाजगी क्षेत्रातील पात्र कर्मचारी वर्ग या पुरस्कारासाठी पात्र राहतील.
प्रस्तावकाचे सेवाकाल किमान १ वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.
प्रस्तावक निर्व्यसनी असावा. अंतिम निवड करताना “बी द चेंज फाउंडेशन” तर्फे संबंधित विभाग/संस्थेशी संपर्क साधून खातरजमा केली जाईल.
कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशी सुरु नसावी किंवा प्रस्तावक निलंबित नसावा.
प्रस्तावकाने आपल्या सेवाकाळात नैतिक आचारसंहिता, प्रामाणिकपणा, जबाबदारी व शिस्तपालनाचे उत्तम उदाहरण सादर केलेले असावे.
प्रस्तावकाने आपल्या कार्याशी संबंधित कोणत्याही प्रकारची चुकीची अथवा दिशाभूल करणारी माहिती दिल्यास त्याचा प्रस्ताव अवैध ठरेल.
प्रस्ताव दाखल करत असताना दिलेली माहिती व पुरावे अचूक व सत्य असणे आवश्यक आहे.
पुरस्कारासाठी सादर केलेले सर्व पुरावे स्वयंसाक्षांकित (Self-attested) असणे आवश्यक आहे.
प्रस्तावकाने आपल्या कार्यक्षेत्रात नवोपक्रम, जनसेवा, पारदर्शकता व समाजहितासाठी केलेले योगदान स्पष्टपणे नमूद करावे.
प्रस्तावात दिलेली माहिती व कागदपत्रे “बी द चेंज फाउंडेशन” च्या तज्ञ समितीद्वारे पडताळणी केली जाईल.
निवड झालेल्या सर्व महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कारार्थींच्या कागदपत्रांची व सेवाविवरणांची अंतिम खातरजमा संबंधित विभाग किंवा खाजगी संस्थेशी थेट संपर्क साधून केली जाईल.
कोणत्याही कारणास्तव चुकीची माहिती दिल्याचे आढळल्यास संबंधित व्यक्तीचा पुरस्कार रद्द करण्यात येईल.
प्रस्तावकाने आपल्या सेवाकाळात नवीन कल्पना, तांत्रिक नवोपक्रम, प्रशासनिक सुधारणा किंवा नागरिकाभिमुख उपक्रम राबविले असल्यास त्यास विशेष प्राधान्य दिले जाईल.
सदर कार्यक्रमासाठी घेतलेले नामांकन शुल्क हे पूर्णतः कार्यक्रमाच्या खर्चासाठी वापरण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सेवाभावी तत्त्वावर – ना नफा ना तोटा – आयोजित करण्यात येत आहे.
राज्य शासन तसेच खाजगी क्षेत्रातील विविध विभागांमधील अधिकारी आणि कर्मचारी वर्ग समाजाच्या प्रगतीसाठी समर्पित वृत्तीने कार्य करत असतात. शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविणे, तसेच खाजगी क्षेत्रातून गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान करणे, नागरिकाभिमुख उपक्रम राबविणे, पारदर्शकता राखणे आणि जनतेचा विश्वास जिंकणे हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे. अशा समर्पित, निष्ठावान आणि अभिनव विचारसरणी असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान दरवर्षी विविध संस्थांद्वारे केला जातो. तथापि, अनेक मेहनती, होतकरू आणि उपक्रमशील अधिकारी/कर्मचारी असे आहेत ज्यांचे योगदान अद्याप व्यापक पातळीवर प्रकाशझोतात आलेले नाही. अशा उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना ओळखून त्यांचा सन्मान करण्याच्या उदात्त हेतूने “बी द चेंज फाउंडेशन” (रजि.) तर्फे “महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६” चे आयोजन करण्यात येत आहे.
| १ | तहसीलदार |
| २ | नायब तहसीलदार |
| ३ | उपविभागीय अधिकारी |
| ४ | मंडळ अधिकारी |
| 5 | वनाधिकारी |
| 1 | तलाठी |
| 2 | लिपिक |
| 3 | लेखनिक |
| 4 | सर्वेक्षक |
| 5 | शिपाई |
| 1 | कृषी अधिकारी |
| 2 | कृषी पर्यवेक्षक |
| 3 | तालुका कृषी अधिकारी |
| 1 | कृषी सहाय्यक |
| 2 | कनिष्ठ लिपिक |
| 3 | प्रयोगशाळा सहाय्यक |
| 4 | वाहनचालक |
| 1 | पशुधन विकास अधिकारी |
| 2 | पशुवैद्यकीय अधिकारी |
| 3 | पशुवैद्य |
| 1 | पशुपालक पर्यवेक्षक |
| 2 | पशुवैद्य सहाय्यक |
| 3 | पशुखाद्य निरीक्षक |
| 4 | लिपिक |
| 5 | पशुवैद्य |
| 1 | जिल्हा दिव्यांग कल्याण अधिकारी |
| 2 | समाजकल्याण अधिकारी |
| 1 | समाजकल्याण निरीक्षक |
| 2 | गृहपरिचर |
| 3 | सहाय्यक लिपिक |
| 4 | लिपिक टंकलेखक |
| 1 | बालविकास प्रकल्प अधिकारी |
| 2 | बालविकास प्रकल्प अधिकारी |
| 1 | अंगणवाडी पर्यवेक्षक |
| 1 | अंगणवाडी सेविका |
| 2 | बालसंवर्धिका |
| 3 | वरिष्ठ लिपिक |
| 4 | परिचारिका |
| 1 | उद्योग निरीक्षक |
| 2 | सहाय्यक उद्योग अधिकारी |
| 1 | लघुउद्योग सहाय्यक |
| 2 | लिपिक |
| 3 | कार्यालयीन परिचर |
| 1 | उपअभियंता |
| 2 | विभागीय अधिकारी |
| 1 | कनिष्ठ अभियंता |
| 2 | नकाशाकार |
| 3 | लिपिक |
| 4 | जलवाहक |
| 1 | उपविभागीय पोलिस अधिकारी |
| 2 | सहाय्यक पोलिस उपअधीक्षक |
| 3 | कारागृह अधीक्षक |
| 1 | पोलिस उपनिरीक्षक |
| 2 | हवालदार |
| 3 | सिपाही |
| 4 | लिपिक |
| 5 | परिचर |
| 1 | सहाय्यक लेखा अधिकारी |
| 2 | लेखा निरीक्षक |
| 1 | लिपिक टंकलेखक |
| 2 | लेखनिक |
| 3 | कनिष्ठ लेखा सहाय्यक |
| 1 | मुख्याध्यापक |
| 2 | सहाय्यक शिक्षणाधिकारी |
| 3 | शिक्षण निरीक्षक |
| 4 | प्राचार्य |
| 1 | शिक्षक |
| 2 | लिपिक |
| 3 | प्रयोगशाळा सहाय्यक |
| 4 | परिचर |
| 5 | अंगणवाडी सेविका |
| 1 | क्रीडा अधिकारी |
| 2 | युवक कल्याण अधिकारी |
| 1 | क्रीडा प्रशिक्षक |
| 2 | लिपिक |
| 3 | मैदान सहाय्यक |
| 4 | खेळाडू |
| 1 | सहाय्यक निबंधक सहकारी संस्था |
| 1 | सहकारी निरीक्षक |
| 2 | लिपिक |
| 3 | कार्यालयीन सहाय्यक |
| 1 | वैद्यकीय अधिकारी |
| 2 | जिल्हा आरोग्य अधिकारी |
| 3 | आरोग्य पर्यवेक्षक |
| 4 | डॉक्टर |
| 1 | स्टाफ नर्स |
| 2 | आरोग्य सेवक |
| 3 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ |
| 4 | लिपिक |
| 1 | सांस्कृतिक अधिकारी |
| 2 | कला संचालक |
| 3 | नाट्य अधिकारी |
| 1 | कला सहाय्यक |
| 2 | लिपिक |
| 3 | तंत्रज्ञ |
| 4 | परिचर |
| 5 | रांगोळी |
| 6 | रांगोळी |
| 7 | छायाचित्रकार |
| 1 | सहाय्यक नगररचनाकार |
| 2 | वैद्यकीय अधिकारी |
| 3 | पुरवठा निरीक्षक |
| 4 | श्रम अधिकारी |
| 1 | कनिष्ठ अभियंता |
| 2 | आरोग्य निरीक्षक |
| 3 | लिपिक |
| 4 | परिचर |
आमच्या मुंबई येथील कार्यक्रमातील शिक्षकांचा मनोगत अनुभव
आमच्या मुंबई येथील कार्यक्रमामध्ये शिक्षकांनी “बी द चेंज फाउंडेशन” च्या उपक्रमांमुळे त्यांना मिळालेली प्रेरणा, सक्षमीकरण आणि त्यांच्या अध्यापन प्रवासात मिळालेला पाठिंबा याबद्दल आपले अनुभव व्यक्त केले.
या अनुभवांमधून आमच्या कार्याचा प्रत्यक्ष परिणाम स्पष्ट दिसून येतो — शिक्षण क्षेत्र अधिक सक्षम बनवणे आणि समर्पित शिक्षकांचा गौरव करणे.
अशाच पद्धतीचा भव्यदिव्य महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार सोहळा २०२६ घेण्याचा आपल्या संस्थेचा मानस आहे.
शासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील अधिकारी/कर्मचारी यांनी कार्यकाळात प्रामाणिक, पारदर्शक आणि जबाबदार सेवा बजावलेली असावी.
कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशी, निलंबन अथवा शिस्तभंग कारवाई प्रलंबित नसावी (शासकीय) किंवा संस्थेतील शिस्तभंग कारवाई नसावी (खाजगी).
विभाग/संस्थेच्या कामकाजात सुलभता, पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवकल्पना राबविलेली असावी.
डिजिटलायझेशन, ई-गव्हर्नन्स, ऑटोमेशन किंवा प्रक्रियेसुधारणा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान असावे.
नागरिकाभिमुख उपक्रम, सामाजिक जबाबदारी (CSR), पर्यावरण संवर्धन, महिला व बालकल्याण, शिक्षण, आरोग्य इत्यादी क्षेत्रात सक्रिय सहभाग असावा.
सहकारी अधिकारी व कर्मचारी यांच्यात समन्वय साधत कामकाज यशस्वीपणे पार पाडलेले असावे.
नेतृत्वगुण, निर्णयक्षमता आणि आव्हानात्मक परिस्थितीत कार्यक्षमतेचे प्रदर्शन केलेले असावे.
संबंधित विभाग, कार्यालय किंवा संस्थेच्या कार्यक्षमतेत मोजता येईल अशी सकारात्मक सुधारणा केलेली असावी.
नागरिक किंवा ग्राहकांना थेट फायदा होईल अशी योजना, सेवा किंवा उपक्रम राबविलेले असावेत.
वैयक्तिक व व्यावसायिक कौशल्यविकासासाठी प्रशिक्षण, कार्यशाळा किंवा संशोधनात्मक उपक्रमात सहभाग घेतलेला असावा.
कार्यक्षेत्रातील ज्ञान, कौशल्य व गुणवत्ता वृद्धी करण्यासाठी सतत प्रयत्नशील असणे.
शासन, संस्था किंवा अन्य प्रतिष्ठित संस्थेकडून प्राप्त पुरस्कार, सन्मान अथवा प्रशस्तीपत्रे असल्यास प्राधान्य.
समाजात प्रेरणादायी ठरणारे कार्य किंवा प्रकल्प राबविलेले असावेत.
शासकीय अथवा खाजगी जबाबदाऱ्या पार पाडताना समाजाशी सुसंवाद राखून सकारात्मक परिणाम घडविणारे कार्य केलेले असावे.
जनजागृती, नैतिक मूल्ये, आरोग्य, स्वच्छता, शिक्षण किंवा पर्यावरण विषयक मोहिमा राबवून समाजावर सकारात्मक प्रभाव निर्माण केलेला असावा.
Ans.“बी द चेंज फाउंडेशन” (रजि.) तर्फे आयोजित हा उपक्रम राज्यातील विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी दरवर्षी आयोजित केला जातो.
Ans.महाराष्ट्र राज्यातील शासकीय,खाजगकीय, निमशासकीय, केंद्र शासनाच्या उपक्रमांतील तसेच समाजहितासाठी कार्य करणारे अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते अर्ज करू शकतात.
Ans. अर्जदाराने www.mahaaward.com या वेबसाईटवर जाऊन “प्रस्ताव सादर करा” या लिंकवर क्लिक करावे. तिथे दिलेल्या फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरून सबमिट करावी.
Ans. होय. वेबसाईटवरून प्रस्ताव अर्ज नमुना डाउनलोड करून तो भरावा व आवश्यक कागदपत्रांसह ई-मेलद्वारे awardmaha@gmail.com वर पाठवावा.
Ans.स्वयं साक्षांकित (self-attested) सेवा प्रमाणपत्र, कार्याचा पुरावा, ओळखपत्र, प्रमाणपत्रांच्या प्रती इत्यादी कागदपत्रे जोडावीत.
Ans. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२६
Ans. प्राप्त प्रस्तावांची पडताळणी “बी द चेंज फाउंडेशन” च्या तज्ज्ञ समितीद्वारे केली जाईल. निवड पारदर्शक निकषांवर आधारित असेल.
Ans.निवड झालेल्या महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कारार्थींना शाल, फेटा, ट्रॉफी आणि सन्मानपत्र देण्यात येईल.
Ans. महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६ साठी ₹३०००/- इतके तर राष्ट्रीय महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६ साठी ₹५०००/- इतके हे शुल्क वेबसाईटवरील “नामनिर्देशन शुल्क भरा” या लिंकवरून भरता येते.
Ans.महसूल, कृषि, गृह, वित्त, शिक्षण, पशुसंवर्धन, दिव्यांग कल्याण, जलसंपदा, सहकार, क्रीडा व युवक कल्याण, महिला व बालकल्याण,आरोग्य,कला तसेच इतर सर्व शासकीय विभागांतील अधिकारी व कर्मचारी पात्र आहेत.
Ans.महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार वितरण समारंभ ६ सप्टेंबर २०२६ रोजी शिर्डी येथे भव्यदिव्य पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे.
Ans.आपल्या कोणत्याही शंका अथवा माहितीकरिता संपर्क करा: 📧 maharashtragungaurav@gmail.com 🌐 www.mahaaward.com 📞 +91 8446663132
अध्यक्ष, महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६
अध्यक्ष, बी द चेंज फाउंडेशन
संचालक, स्केलझेन टेक्नॉलॉजी'ज प्रायव्हेट लिमिटेड
https://scalezen.in/
मयूर ढोकचोळे हे Scalezen Technologies Private Limited या शैक्षणिक सल्लागार कंपनीचे संस्थापक आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व आहेत. शिक्षण क्षेत्रात त्यांचा प्रचंड अनुभव असून, त्यांनी CBSE शाळा, इंग्रजी माध्यम शाळा आणि NDA अकॅडमीमध्ये पाच वर्षे प्राचार्य म्हणून यशस्वी कारकीर्द बजावली आहे.
फक्त एका संस्थेपुरते मर्यादित न राहता, ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचावे या उद्देशाने त्यांनी Scalezen Technologies Pvt. Ltd. ची स्थापना केली. या कंपनीमार्फत ते विविध शाळा, कॉलेजेस आणि NDA/NEET/JEE अकॅडमीसाठी शैक्षणिक व प्रशासकीय मार्गदर्शन, व्यवस्थापन सुलभीकरण आणि टेक्नॉलॉजी सोल्युशन्स देत आहेत.
ScaleZen ही कंपनी सध्या शाळा, कॉलेजेस, इंजिनिअरिंग आणि मेडिकल महाविद्यालये अशा विविध प्रकारच्या ३० पेक्षा जास्त शैक्षणिक संस्थांमध्ये आपली कन्सल्टन्सी सेवा पुरवत आहे. या सर्व संस्थांमध्ये ScaleZen कंपनी अकॅडेमिक, ऍडमिनीट्रेशन, डिजिटल मार्केटिंग, ब्रँडिंग, अॅडमिशन कन्सल्टन्सी, शैक्षणिक धोरण आखणी आणि व्यवस्थापन या क्षेत्रात सल्ला व सेवा पुरवत आहे.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा मिळाव्यात, अभ्यासक्रमानुसार सराव करता यावा यासाठी त्यांनी "परीक्षा पोर्टल" या मोबाइल व वेब ॲपची निर्मिती केली आहे. आज अनेक विद्यार्थी या ॲपचा लाभ घेत असून, त्याचा उपयोग दैनिक सराव, डेली टेस्ट्स, स्टडी मटेरियल आणि निकाल व्यवस्थापनासाठी केला जातो.